एटापल्ली : तालुक्यात पक्क्या रस्त्यांच्या अभावासह अनेक मार्गावर पुलांचा अभाव आहे. परिणामी पावसाळ्यात अनेकदा मार्ग बंद राहत असल्याने वाहतूक ठप्प होते. त्यामुळे तालुक्यातील पुलांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय जनहितवादी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील एकरा (खुर्द), भापडा, ताडगुडा, कोईंदवश्री, देलंदा नंदी, शेवारी नाल्यावर पूल नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात पुराचा फटका सहन करावा लागतो. त्यामुळे या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करावे, पुलांअभावी नागरिकांना वाहनाने प्रवास करता येत नाही. अनेकदा सायकल अथवा बैलगाडीनेच २0 ते २५ किमी अंतर स्वस्त धान्य आणण्याकरिता जावे लागते. या भागात अनेक भागात स्वस्त धान्य दुकाने नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. या भागात रस्त्यांची दुर्दशा असून नागरिकांना वाहन चालवितांना त्रास सहन करावा लागत आहे. कसनसुर मार्ग दुरवस्थेत असून या भागातील नागरिकांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे कमालीचा त्रास होत आहे. यापूर्वीही शासनाकडे सदर रस्त्यांची दुरूस्ती तसेच नवीन पुलांचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील पुलांचे बांधकाम व पक्क्या रस्त्यांची निर्मिती रखडली आहे. तालुका दुर्गम भाग म्हणून ओळखला जात असल्याने येथील पूल व रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
.
<< Back to Headlines Next >>
![]() |
0 Comments