एटापल्ली : दिवाळीत एसटीने गावी जाण्याचा विचार करीत असाल तर जादा पैशांचे नियोजन करा.. कारण ऐन दिवाळीत भाडेवाढीचा बॉम्ब टाकण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ही भाडेवाढ ५ ते २५ नोव्हेंबर या काळापुरती नियोजित असली तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. एसटीला यातून १0 कोटींचा फायदा होणार असल्यानेच ही वाढ होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
0 Comments