एटापल्ली :पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक बहरत आलेले असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण या सणात आनंदाचे वातावरण असते. यंदा गडचिरोलीसह विदर्भ व राज्यात दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकर्यांची शेती पेरणीविना पडीत आहे. अशाच स्थितीत बैलाच्या पोळ्यासाठी बळीराजा तयारी करीत आहे. त्यातच सध्या बाजारात रंगबिरंगी कासरे ८0 ते १00 रुपयांपयर्ंत विकल्या जात आहे. मटाकी जोडी ८0 ते १00, वेसन ७0 ते ८0, तोडा ६00 ते ८00, झुल ८00 ते ११00, घुंगरू पट्टा ४00 ते ५00, चवर ३0 रुपयात विकल्या जात आहे. रंग, बेगड, गेरू, कवडीमाळ, जिलेटीन पेपर, वार्निश सर्व वस्तू बाजारात उपलब्ध आहे. मागील वर्षीपेक्षा २५ ते ३0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत बैलांना सजविण्यासाठी लागणार्या वस्तू सरासरी २५ ते ३0 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पोळ्याच्या दिवशी बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतन) देण्यात येते. वर्षभर ज्या बैलाच्या खांद्यावर जोखड ठेवले जाते. त्या बैलाच्या खांद्याला लोणी व तुपाचे गोळे लावले जातात. त्यासोबत हळदही लावली जाते. वर्षभर बैलांसोबत शेतीत राबवणारा गडीही या बैलाची पूजा करतो. त्यानंतर शेतमालकाच्या गोठय़ात गड्याची खोळ भरली जाते. हर हर महादेवची गर्जना करून बैलाला आदल्या दिवशीही गोड पदार्थाचा नैवद्य खाऊ घातला जातो. विदर्भाच्या अनेक भागात ही प्रथा आजही कायम आहे. पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल जोडीला नदीवर/ओढय़ात नेऊन धुतले जाते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. त्यांच्या पाठीवर नक्षिकाम केलेली झुल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाक्या (एक प्रकारचा श्रुंगार) गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा कटदोर्याचे तोडे घालून त्यांना गावाच्या शिवेजवळ भरणार्या पोळ्यात नेले जाते. तेथे आंब्याचे तोरण बांधून त्याखाली बैलजोड्यांना उभे केले जाते. विदर्भाच्या काही भागात बैलांच्या शिंगांना पेटत्या मशाली लावण्याचीही प्रथा आहे. तर काही भागात तोरणाखाली बैल उभे करण्यापूर्वी गावाच्या प्रमुख मंदिराला बैलजोडी प्रदक्षिणा घालण्याचीही प्रथा आहे. येथे महादेवाची गाणी व झडती म्हटली जाते. त्यानंतर तोरण तोडून पोळा फुटतो. त्यानंतर बैलजोडी आपल्या मालकाच्या घरी गडी घेऊन येतो. तेथे बैलजोडीची पूजा सुहासिनीच्या हस्ते केली जाते. बैलांना खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो. बैलाची निगा राखणार्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
पोळा ज्या जागेवर भरतो, तेथे बैलजोड्यांच्या उपस्थितीत त्या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील/ श्रीमंत जमिनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्यास बोजारा (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळा सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागात अनेक लोक घराच्या प्रवेशद्वारावर पळसाच्या झाडांच्या फांद्या ठेवतात. त्याला बेलपत्री बांधली जाते. दुसर्या दिवशी बेलपत्रीसह या काड्या सकाळीच विसर्जित केल्या जातात. अनेक गावात मारबती काढल्या जातात. 'इडा-पिडा टळू दे, गावावरचे संकट घेऊन जा' अशी विनवणी या मारबतींना केली जाते व मारबतीची मिरवणूक संपूर्ण गावभर काढल्यानंतर दुपारी या मारबतीचे विसर्जन करण्यात येते. त्यानंतर नागरिक व शेतकरी तान्हापोळ्याच्या तयारीला लागतात. गडचिरोली :पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीक बहरत आलेले असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण या सणात आनंदाचे वातावरण असते.
.
<< Back to Headlines Next >>
![]() |
0 Comments