सावधान सावधान सावधान
जनधन योजनेच्या माध्यमातून घरबसल्या २५ हजार रूपये मिळविण्याची संधी आहे, अशी खोटी माहिती देऊन नागेपल्ली येथील लालसू महारूवड्डे या इसमाला ५0 हजार रूपयांनी फसविण्यात आले आहे. याबाबतची तक्रार वड्डे यांनी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून घर बसल्या २५ हजार ते ६0 हजार रूपये प्रतिमहिना कमवा, अशी जाहिरात एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर वड्डे यांनी संपर्क साधला असताना, त्यांना ६0१७८२१२८0२ हा बँक खाते क्रमांक देण्यात आला. यावर ५0 हजार रूपये टाकण्यात सांगण्यात आले. वड्डे यांनी खोट्या आश्वासनाला बळी पडत बँकेमध्ये सर्वप्रथम ५0 हजार रूपये टाकले. त्यानंतर आणखी पैसे टाकण्याबाबत त्यांना फोन येऊ लागले. पूनम कुमार नामक व्यक्ती बोलत होता, असे अहेरी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लालसू वड्डे यांनी याबाबतची तक्रार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये दिली असून आरोपीवर कारवाई करावी व पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे.
0 Comments